HW News Marathi
Covid-19

राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ४ कसा असेल याचा दिला अंदाज

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरू आहे. हा तिसरा लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. त्यानंतर चौथा लॉकडाऊन सुरु होणार आहे त्याबद्दलची माहिती लवकरच शासनाकडून देण्यात येणार आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची एक कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक झाली त्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की 18 मे नंतर सुरू होणाऱ्या चौथ्या लॉकडाऊन बद्दल सध्या चर्चा सुरू आहे.मात्र, रेडझोन मध्ये असलेल्या भागांना इतक्यात शिथिलता मिळू शकत नाही. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्या काही भागांमध्ये नियमांची शिथिलता करण्यात येईल.
मुंबई आणि पुण्यातील भाग हा हा रेड झोन’मध्ये असल्याने येथील नियमांना इतक्यात शिथिलता देऊ शकत नाही असही राजेश टोपे यांनी सांगितलं दरम्यान लवकरच राज्य शासनाकडून लोकांबद्दल चे नियम सांगण्यात येतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त झालेल्यांची प्लाझ्मा देत कोरोनाग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात

News Desk

कुठल्या प्रश्नावर आंदोलनं करायची याचं भान भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही !

News Desk

शिव वडापावनंतर आता शिव दवाखाना, डॉक्टरांऐवजी कंपाउंडर असणार !

News Desk