HW News Marathi
Covid-19

इतर राज्यांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये हीच मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा!

पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन, औषधे याचा तुटवडा भासत होता. या च अनुशंगाने राज्यात पावले उचलली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर अनेक साखर कारखाने ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत आहेत. आपलं राज्य आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या पायावर आपण उभं राहावं तसंच इतर राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित आहेत. या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आशा वर्करच्या संपाबाबत चर्चा

“आशा वर्करबाबत माझी युनिअनसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याने ते आंदोलन करणार नाहीत. तरीदेखील ते आंदोलन करणार असतील, तर ते चुकीचे आहे. आशा वर्करबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबतचर्चा करून प्रश्न मार्गी लावले जातील,” असं आश्वासन राजेश टोपे यांनी यावेळी दिलं.

आरक्षणावर भाष्य

“जोवर केंद्राच्या कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्यांनी बदल करावा, आपण तो स्विकारणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची आहे,” असंही त्यांनी सांगितलं. “सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त दर आहे. त्या ठिकाणी आमचं लक्ष असून लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्राने जास्तीत जास्त लसी द्याव्यात

“केंद्राने अधिकाधिक लस द्यावी. आतापर्यंत आपण तीन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे, १३ कोटी लसीकरण करणे बाकी आहे. उर्वरित राहिलेले लसीकरण देखील तीन ते चार महिन्यात पूर्ण करू. मात्र आपल्याला केंद्र सरकारने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे,” असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांवर मोफत उपचार

“राज्य सरकाराच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १३३ रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांवर उपचार मोफत केले जात आहेत. त्या आजारासाठी एमफोटेरिसिन इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. जे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्याकडून रुग्णालयाने इंजेक्शनसाठी जादा पैसे घेऊ नये,” अशी सूचना राजेश टोपेंनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक, आनंद महिंद्रांनी वाजवल्या टाळ्या

News Desk

“कंगनाविरुद्धच्या शिवसेनेच्या आंदोलनाला परवानगी, मग ‘मनसे’ला नोटीस का ?”

News Desk

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरे म्हणतात…

News Desk