HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रुग्णालयात दाखल

पुणे | माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या तब्येत बिघडली आहे. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ECG मध्ये काहीशी अडचण दिसल्याने त्यांना आयसीयुत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

दुसरीकडे सध्या राज्याच राज्यपाल नियुक्त १२ आमदार कोण असणार याची चर्चा रंगली आहे. १२ जागांपैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल असे म्हटले जात आहे. तर उर्वरित जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजत आहे. यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्यांना लोकल प्रवास कधीपासून? विजय वडेट्टीवारांच स्पष्टिकरण!

News Desk

धमकीचा फोन आल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा लगेचच विश्वास नांगरे-पाटलांना फोन

News Desk

राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

News Desk