HW News Marathi
महाराष्ट्र

रक्षा खडसेंकडून मोदींच्या कृषी बिलाची पाठराखण !

जळगाव | दिल्लीमध्ये कृषी बिलावरून सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अत्यंत आक्रमक स्वरूप घेतले आहे.एकीकडे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही या आंदेलनांना पाठिंबा दिला जात आहे .मात्र खडसेंच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी या कृषी बिलाचे समर्थन केले आहे. ‘कोणीतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे ,त्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

रक्षा खडसे म्हणतात की , कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेले आहे, शेतकऱ्यांचे आंदोलन बंद व्हावे यासाठी कृषिमंत्री ही वारंवार बैठका घेत आहेत, शेतकऱ्यांच्या समजूत काढत आहेत, या कृषी बिलामुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे, शेतकऱ्यांचे नुकसान न होणार हे कृषी बिल आहे ,शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे ,अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासंदर्भात दीपक केसरकरांचे मोठे विधान

Aprna

‘मूड ऑफ दी नेशन’च्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावले !

News Desk

“…हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो?”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Aprna