HW News Marathi
Covid-19

रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

रावेर | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. नेत्यांना देखील कोरोना होण्याची संख्या वाढत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली. आता त्या पाठोपाठ भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. काल रात्री अचानक प्रकृती बिघडली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट केली असता, रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे, मुक्ताईनगरच्या खासदार कार्यालयाकडून माहिती देण्यात आली असुन रक्षा खडसे यांनी स्वतः देखील ट्विट करत माहिती दिली आहे.

‘रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला, तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी’, असे ट्विट रक्षा खडसे यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

News Desk

राज्यात आजपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिला-दुसरा टप्पा सुरु, तर काय सुरू-काय बंद असणार ?

News Desk

आता RTPCR चाचणी करा फक्त ५०० रुपयांत! 

News Desk