HW News Marathi
महाराष्ट्र

“मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे”, राम कदमांची ती ऑडिओ क्लिप वायरल 

मुंबई | पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका करण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या या संभाषणात राम कदम आरोपींची सुटका करण्यास सांगत आहेत. पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना आरोपींनी मारहाण केली होती. त्या आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांनी हा फोन केल्याचं या ऑडीओ क्लिपमध्ये आहे.

सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी या आरोपींची नावं असून ते दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होते. याशिवाय त्यांनी एका वाहनालाही धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र यानंतरही आरोपींकडून कायद्याचं उल्लंघन केलं जात होतं. पोलीस रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसंच मारहाण केली होती.यानंतर राम कदम यांनी पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. “मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं अजून लग्नही झालेलं नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटलं असतं. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा,” असं राम कदम सांगत असल्याचं ऐकू येत आहे.राम कदम यांनी यावेळी त्यांची सुटका करा सांगणं योग्य नाही असं सांगत यामुळे त्यांचं करिअर संपेल असं म्हटलं.

दुसरीकडे कॉन्सेबल राम कदम यांना मी आमदार म्हणून तुमचा आदर करतो, पण जर त्यांची सुटका केली तर महाराष्ट्र पोलिसांना मारहाण करण्याची हिंमत त्यांच्यात येईल असं उत्तर दिलं.“तिघांनीही एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. माझ्याजागी तुम्ही असता तर काय केलं असतं? त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. माझाही आत्मसन्मान आहे,” असं पोलीस कॉन्स्टेबल बोलताना ऐकू येत आहे. यावेळी त्याने आपण तुमची मदत करु शकत नाही असंही राम कदम यांना सांगितलं. आरोपी घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये काम करत असल्याची माहिती आहे.

याशिवाय ते भाजपाच्या आयटी सेल आणि इतर विभागांमध्येही काम करतात.पोलिसांला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांनाच फोन करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज (१२ जानेवारी) युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे.

पोलिसांन मारहाण करणाऱ्यांना सोडा म्हणणं दुर्दैवी – एकनाथ शिंदे

शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, “कोविड काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन काम केलं. यात कितीतरी पोलीस शहीद झाले. असं काम करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली जाते. मारहाण करणाऱ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे कृत्य निषेध करण्यासारखं आहे. मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचं संरक्षण पोलीसच करतात आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांना सोडा असं म्हणणं हे दुर्दैवी आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाईविरोधात ३१ मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह! – नाना पटोले

Aprna

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna

“मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं?”, फडणवीसांचा सवाल

News Desk