मुंबई | संपूर्ण जग सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. कोरोनामीळे कित्येक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तर काही जणांनी कोरोनावर यशस्वी मातही केली आहे. अशात, काही रुग्णालयांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या लोकांनी अनेक त्रासांमधुन जावे लागत आहे. मुंबईतील के.ई.एम रुग्णालयामध्ये रुग्णांवर जमिनीवर बसण्याची वेळ आली आहे.
या सर्व रुग्णांच्या वैद्यकीय सेवेचं काय? असा सवाल उपस्थित करत भाजपचे नेते राम कदम यांनी आता तरी सरकारला जाग येणार का असा प्रश्न विचारला आहे. राम कदम यांनी के.ई.एम रुग्णालयातील हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत रुग्णांचे किती हाल होत आहेत हे दाखवायचा प्रयत्न केला आहे.
या रुग्णालयात अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्याकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच, मधूनच कोणाला स्ट्रेचरवरुन घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, जमिनिवर बसलेल्या रुग्णांकडे कोणाचे लक्ष नाही आहे. त्यांना उपचार कधी मिळणार? सरकारला जाग कधी येणार? असे प्रश्न राम कदम यांनी विचारले आहेत. या आधीही भाजपच्या नेत्यांनी असा प्रश्न सरकारला विचारला होता.
#KEM hospital today 11.45 am .. video . you can see how no of patients are siting on ground ? No medical help ? Nothing ? So sad . Wil maharashtra govt wake up ? @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 pic.twitter.com/HzA8WBQLwR
— Ram Kadam (@ramkadam) May 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.