HW News Marathi
महाराष्ट्र

दलित अत्याचाराविरुद्ध मुग गिळून बसणाऱ्या खासदारांनी आम्हाला शिकवू नये-रामदास आठवले

मुंबई | रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये’, असा जबरदस्त शाब्दिक वार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होताच्या टीकेला पलटवार देत रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, ‘संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचराविरुद्ध मी मूळ पँथर असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्यामूळे पुन्हा संजय राऊत काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तसेच, ‘हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची भेट ही पूर्वनियोजित होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला, आंदोलन केले. लखनऊला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे मी २ ऑक्टोबरला हाथरसला जाऊ शकलो नाही आता मात्र आजच हाथरसला जाऊन पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार आहे,’ असा खुलासाही यावेळी आठवलेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० मे पर्यंत शेतकरी कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार

News Desk

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन | जयंत पाटील

News Desk

“वानखेडेंची नोकरी जाणार की मलिकांचं मंत्रिपद? पाहुयात”, आठवलेंचा सूचक इशारा 

News Desk