HW News Marathi
महाराष्ट्र

सर्व धार्मिक स्थळे ८ सप्टेंबरपर्यंत सुरु करा अन्यथा आंदोलन करु, रामदास आठवलेंचा इशारा 

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. मात्र, अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे ही बंद आहेत. ती राज्य सरकारने पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली जात आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही सर्व धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे ट्विट करत केली आहे.

“मंदिर, मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा ही सर्व धार्मिक स्थळे ८ सप्टेंबरपर्यंत सुरु व्हावी. तसेच, सर्व सुरक्षा आणि नियामांचे पालन करुन पोलिसांच्या बंदोबस्ताने ही स्थळे सुरु करावीत अन्यथा रिपाई ९ सप्टेंबरला आंदोलन करेल”, असा इशारा यावेळी रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान, काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार 

News Desk

कोरोनानंतर आता झिका व्हायरसची चिंता ! केरळात १४ जणांना लागण!

News Desk

“एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले”, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

News Desk