HW News Marathi
महाराष्ट्र

जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, परीक्षेच्या तारखेत झाला बदल

मुंबई | नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. ojcd/ev, तिसऱ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे. चौथ्या सेशनच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं NTA ने सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करायचे आहे. या वेबसाईटवर भेट देऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन नंबर भरायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

या आधी जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठी 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात येणार होत्या तर चौथ्या सेशनसाठी परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येणार होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून तिसऱ्या सेशनसाठी आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे तर चौथ्या सेशनच्या तारखांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल, मे या चार सेशनमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

या वर्षी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सद्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे. जेणेकरून कोरोनासंबंधी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल कधी सुरू होणार? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

News Desk

‘या’ कारणासाठी १४ एप्रिलला संजय राऊत बेळगावला जाणार

News Desk

दगडफेक करण्यात पुरुषार्थ नाही, कुठली शिवसेना? मी ओळखत नाही!

News Desk