मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज नवीन घडामोड घडतेय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज क्रांती रेडकर यांची भेट घेतली. यानंतर आठवले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. समाजाचे नेते आणि आंबेडकरांचे अनुयायी आहात, आपण या संबंधी भूमिका घेतली पाहिजे, अशी विनंती मला क्रांती यांनी केली आहे.
क्रांती रेडकर माझ्या घरी आली. त्यामुळे आता मलाही पिक्चरमध्ये काम करावे लागेल
आमच्या पाठिशी उभे राहा. असे त्यांनी म्हटल्यानंतर मी त्यांच्या पाठिशी उभा आहे. असे रामदास आठवले म्हणाले.त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे आहे. नवाब मलिकांनी पिक्चर अभी बाकी आहे. असे म्हटले होते. त्या पिक्चर मी येणे अजून बाकी आहे. क्रांती रेडकर माझ्या घरी आली. त्यामुळे आता मलाही पिक्चरमध्ये काम करावे लागेल. असे रामदास आठवले म्हणाले.
मी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी आहे. हे बाबासाहेबांचे अनुयायी असून ते महारच आहेत. ते मुस्लिम नाहीयेत. त्यांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी मला सगळे डॉक्यूमेंट्स दाखवले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.