HW News Marathi
महाराष्ट्र

रेमडेसिविरचा ‘गेम’डीसिवीर करू नका, आठवलेंचा सरकारला सल्लेवजा टोला

मुंबई | महाराष्ट्रात एकीकडे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य व्यवस्था कोलमडलं चालली आहे. रेमडेसिविरचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमरता अशा अनेक अडचणींना राज्य सरकारला सामोरे जावे लागत आहेत. दरम्यानच्या काळात रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. यावरुन भाजपने राज्य सरकारला एकीकडे धारेवर धरले असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारला सुनावले आहे.

रेमडेसिविरचा गेमडेसिवीर करू नका

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला डिवचले आहे. रेमडेसिविरचा गेमडेसिवीर करू नका, असा टोला रामदास आठवले यांनी माध्यमांसी संवाद साधताना महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला आहे.

रेमडेसिविरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

राज्य सरकारचा केंद्राकडे बोट दाखवत अपयश लपवण्याचा प्रयत्न

राज्यातील एकूण कोरोनाची स्थिती पाहता रामदास आठवले असं म्हणाले की, मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत. रुग्णांना बेड मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग! सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुल कोसळला

Aprna

शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांवर संतापले!

News Desk

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींचे संबंध काय?, किरीट सोमय्यांचा सवाल

Aprna