HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी रोहित पवारांना भर सभेत खडसावल, ”अरे शहाण्या… तू आमदार आहेस”

अहमदनगर। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात हजेरी लावली होती. यावेळी तिथे गेल्यानंतर कोणीच मास्क घातला नव्हता. यावरुन अजित पवारांनी पहिल्यांदा आमदार रोहित पवार यांना भर कार्यक्रमात चांगल्याच कानपिचक्या दिल्या.अजित पवार कोरोनाच्या काळात मास्क आणि इतर आवश्यक ती काळजी घेतात. ते नेहमीच सतर्क असतात. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर ते काळजी घेतात. तसंच आजूबाजूच्या लोकांनाही मास्कचा वापर करा अस सांगतात. मात्र आता चक्क आपला पुतण्या असलेला आमदार अर्थातच कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांना भर सभेत चांगलेच खडसावले आहे.

काल अजित पवारांनी रोहित पवार यांना मास्क न वापरण्यावरुनच खडसावल आहे. रोहितला मी म्हणलो, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस. तू मास्क वापरलास तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही आणि लोक मास्क वापरत नाहीत, हे बरोबर नाही असं अजित पवार म्हणाले.यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक करत ‘रोहित पवार काम करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही गप्प गुमान बसा’ असा सल्लाच अजित पवार यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना दिला काल अहमदनगर जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी अजित पवार हे बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीनं राज्यशासन घेणार मोठा निर्णय- अजित पवार

News Desk

काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजपा अन् RSS ची विभाजनवादी!

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांवर, कोरोना रुग्णसंख्या वाढतीच!

News Desk