HW News Marathi
देश / विदेश

रामदास आठवलेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली | आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या दिल्लीत भेट झाल्याने आठवले पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास उधान आले आहे. आगामी राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी शरद पवारांच्या भेट घेतल्याचे बोलेल जाते. कारण भाजपकडून आठवलेंना राज्यसभेत संधी दिली जाणार नाही.

दरम्यान, आठवलेंच्या घरी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली. भाजपने फारच अडवणूक केली तर आठवले हे महाविकास आघाडीचा विचार करू शकतात, अशी शक्यताही या भेटीमागे वर्तविण्यात येत आहे.माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलविण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. यामुळे आठवलेंचे राज्यसभेत भाजपकडून वर्णी लागणे अवघड असल्याचे बोले जाते.

यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी रामदास आठवले हे भाजपसोबत महायुतीत आले. त्यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने आठवले यांना राज्यसभेची एक जागा सोडण्यात आली. नंतरच्या काळातही भाजपने आठवलेंना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी दिली. पण आता त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली

News Desk

उदयनराजेंच्या समर्थनार्थ संभाजी भिंडेंची सांगली बंदची हाक!

Arati More

लातूरमधून जम्मू-काश्मीरचे ४ जण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

News Desk