HW News Marathi
महाराष्ट्र

राणे,नवनीत राणांनंतर आता महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवटीची’ आठवलेंची मागणी!

मुंबई | राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरणावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. या सगळ्या मुद्यावरुन भाजपचे नेते नारायण राणे, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. तसं पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. आता यांच्या पाठोपाठ रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्मंयत्री रामदास आठवले यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. ‘सचिन वाझे यांच्या मागे कोण आहे ते शोधून काढावे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. तसे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी ८ मार्चला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. तसेच, नारायण राणे यांनी, ‘अमित शहा यांना मी पत्रपाठवून मी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थितीत हाताळण्यास अपयशी ठरत असल्याचं निदर्शनास आणून दिले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे, ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी अमित शहांना पत्र लिहिले आहे’, असंही नारायण राणेंनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी भाजपच्या प्रवीण दरेकरांची भेट का घेतली?

News Desk

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दिलासा नाहीच!

News Desk

“उच्च न्यायालय म्हणाले कनिष्ठ कोर्टात जा, FIRशिवाय सीबीआय चौकशी कशी?”

News Desk