HW News Marathi
महाराष्ट्र

राणा म्हणतात, ‘मला कुठलीही नोटीस नाही’!


अमरावती। रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अश्या बातम्या सकाळपासून तुम्ही बघत असाल. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले. न्यायालयाने हे आदेश सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. राणा यांच्यावर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप आहे. दरम्यान, राणा यांनी आपल्याला कुठलीही नोटीस आली नसल्याचं म्हटलंय.

मला कुठलीही नोटीस आलेली नाही

मला कुठलीही नोटीस आलेली नाही. दरम्यान, न्यायालयात मी माझी बाजू मांडणार आहे. निवडणुकीत मी मर्यादित खर्च केला, असं रवी राणा यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि याचिकाकर्ते सुनील खराटे यांनी सांगितलं की, रवी राणा यांनी मर्यादित खर्चापेक्षा अधिक खर्च केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही खराटे यांनी केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आपले उत्तर दाखल करावे

अमरावतीतील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवर राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले नव्हते. ही याचिका बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असून पुढील दोन आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाने आपले उत्तर दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. यावर आयोगाने न्यायालयापुढे ही माहिती सादर केली.

सुनिल भालेराव आणि सुनिल खराटे यांनी रवी राणांनी अतिरीक्त खर्च केला असा आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना आता न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. तसेच संबंधित कारवाई येत्या 6 महिन्यात पुर्ण केली जाईल, असं न्यायालयाला आयोगाने सांगितलं आहे.

कोर्टाच्या या निकालानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

दरम्यान याआधी रवी राणा यांच्या पत्नी तथा खासदार नवनीत राणा यांनासुद्धा न्यायालयाने दणका दिला होता. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने जून 2021 मध्ये रद्द केलं होतं. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला होता. नवनीत राणा यांना हायकोर्टानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला होता. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. कोर्टाच्या या निकालानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार करावा अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साकीनाका बलात्कार प्रकरण, रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार, RPIतर्फे 1 लाख रुपयांची मदत!

News Desk

सर्व माध्यमात दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

News Desk

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे वर्षा गायकवाड यांचे आवाहन

News Desk