HW News Marathi
महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंना लागली लॉटरी, थेट रेल्वे राज्य मंत्रीपद!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल (७ जुलै) पार पडला. काल (७ जुलै) ४३ जणांनी शपथ घेतली. प्रामुख्याने लक्ष ज्यांनी वेधलं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या ४ मंत्र्यांनी. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची काल जशी चर्चा होती, तशीच राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांवरही काल चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून संजय धोत्रे, प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती रावसाहेब दानवेंची. रावसाहेब दानवे यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा होती. पण झालं उलटच. प्रत्यक्षात दाजींना लॉटरी लागली.

रावसाहेब दानवेंनी थेट रेल्वे राज्य मंत्रिपद

मंत्रिमंडळाची नवे जाहीर करण्याआधी १२ नेत्यांनी आपला राजीनामा दिला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून संजय धोत्रे, प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यानंतर प्रकाश जावडेकर सारख्या मातब्बर मंत्र्याने राजीनामा दिल्याचं वृत्त आल्याने मोदींनी दाजींची विकेट घेतली असणार हे पक्क झालं. महाराष्ट्रातील चार मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठीच दाजींचा राजीनामा घेतला असावा असा कयास वर्तवला जात होता. दाजींच्या राजीनाम्याचं वृत्त आल्याने भोकरदनमध्ये दाजींच्या कार्यकर्त्यांचा चेहरा पडला होता. तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते काहीही बोलण्यास नकार देत होते. त्यामुळे दानवे दाजींनी खरोखरच राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती.

दानवेंकडे अत्यंत महत्त्वाचं खातं

एकीकडे जिथे रावसाहेब दानवेंच्या राजीनामाच्या चर्चा होत होत्या तिथे दुसरीकडे नरेंद्र मोदींनी पूर्ण गेम फिरवला. दानवेंकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यातच आता त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दानवेंकडे अत्यंत महत्त्वाचं खातं देण्यात आलं. त्यामुळे आता मोदी मंत्रिमंडळात दाजींचे वजन वाढल्याची चर्चा रंगत आहे.

कोण आहेत रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्य मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. काल एकामागोमाग 12 मंत्र्यांनी राजीनामा दिले. त्यातच दानवे दाजींनी राजीनामा दिल्याचं वृत्त आलं. ‘संजय धोत्रेंचा राजीनामा घेतल्यानंतर त्याच दरम्यान मी दिल्लीसाठी विमानात बसलो. त्यामुळे माध्यमांना वाटलं की माझाही राजीनामा होऊ शकतो. पण माझा राजीनामा पक्षानं मागितलाही नाही. तसं कुणीही मला सांगितलं नाही. त्यामुळे मोदींचा माझ्यावर विश्वास असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे’, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk

‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’, मनसेचे नवा अभिनव उपक्रम!

News Desk

राहुल आणि प्रियांका गांधी पायी हाथरसला रवाना…

News Desk