HW News Marathi
देश / विदेश

भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादी – समाजवादी पार्टीची युती!

नवी दिल्ली | भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये नेहमीच वाद असतात. काँग्रेस पक्षाने आता भाजप विरोधात वेगळीच खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी

भाजपला सत्तेत पाडण्यासाठी आता राजिक्य हालचालींना ऊत आला आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

“महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखं उत्तर प्रदेशात देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे समाजवादी बरोबर आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजपाला रोखू,” असे केके शर्मा यांनी म्हटले आहे.

भाजप सरकार लोकशाही साठी घातक

भाजप हे लोकशाही घातक आहे अशी प्रतिक्रिया के. के शर्मांनी दिली आहे. शर्मा म्हणाले की, “पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रवादीला उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवावा लागेल कारण तेथील भाजपा सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि आवाज दडपला जात आहे.”

‘राज्य वाचवा, संविधान वाचवा’ आंदोलन सुरू

शर्मा म्हणाले की “जबरदस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करीत असेल तर त्याला काय हरकत नसावी.” त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, “१ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर ‘राज्य वाचवा, संविधान वाचवा’ आंदोलन सुरू करेल, ज्यामध्ये शेतकरी व युवकांवर लक्ष केंद्रीत केल्या जाईल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये मिळणार संधी ! फडणवीसांची दिल्ली वारी….

News Desk

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk

‘चांद्रयान-२’ ने पाठविले चंद्राच्या विवरांचे फोटो

News Desk