HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सोमय्यांवर भडकल्या

अहमदनगर | ‘भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अहमदगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. त्यांनी ते आरोप थांबबावेत, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी दिला आहे. ‘भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अहमदगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. त्यांनी ते आरोप थांबबावेत, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी दिला आहे.

आमचे नेते पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागल पाहिजे हे शिकून घ्या

अ‍ॅड. लगड यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी आमचे नेते खासदार शरद पवार व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात. सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्या आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागल पाहिजे हे शिकून घ्या,’ असा सल्लाही लगड यांनी सोमय्या यांना दिला आहे.

‘तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची भीती दाखवू शकत नाही. ईडी काय तुम्हाला तुमच्या घरची मालमत्ता वाटते का? उठसुठ ईडीचा बागुलबुवा दाखवून बेछुट आरोप करण थांबवावे, अन्यथा आम्हाला तुमच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात फौजदारी कारवाई करणे भाग पडेल,’ असा इशाराही अ‍ॅड. लगड यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकरासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले…

Aprna

नगर, पुण्यासह राज्यातील आणखी अनेक भागांत मुसळधार पाऊस

News Desk

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा

News Desk