HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार रवी राणा यांची प्रकृती खालवल्याने केले रुग्णालयात दाखल

मुंबई | कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रेडीएन्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचीही स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. काल (१७ एप्रिल) त्यांना ताप आल्यामुळे डॉक्टरांनी घरी जाऊन त्यांची तपासणी केली होती. मात्र, तरीही ताप कमी होत नसल्याकारणाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबईच्या डॉक्टरांशीही संपर्क साधून अधिक माहिती घेतली आहे. तसेच, त्याच्या लहान बाळाला दुसऱ्या कक्षात ठेवले आहे. कोरोनाचा संसर्ग हा वाढत चालला आहे. आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत चालले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वगुरुच्या कृपेने भारतात जगातील सर्वात जास्त महाग एलपीजी! – नाना पटोले

Aprna

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादींच्या याचिकेवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

राम शिंदेंच्या चौंडी गावात रोहित पवारांच्या पॅनलने मारली  बाजी

News Desk