HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर हल्ला

Lबुलढाणा | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या चिखली रोड स्थित कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना त्यांच्याच (सावळा) गावातील जनार्धन गाडेकर नामक इसमाने हातात कुर्‍हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती आहे.

यावेळी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक मधात आल्याने अनर्थ टळला.पण, झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यकाला छातीत मार बसल्याची माहिती आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, पंकजांचं सूचक वक्तव्य

News Desk

सचिन पायलट यांचं समर्थन केल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता निलंबित !

News Desk