HW News Marathi
महाराष्ट्र

रविकांत तुपकर पुन्हा एकदा ‘स्वाभिमानी’त करणार प्रवेश

कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत रविकांत तुपकर रयत क्रांती संघटनेत गेले होते. मात्र आता तुपकर पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. तुपकर आज (१६ ऑक्टोबर) कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करत पक्षात परतणार आहेत.

तुपकर यांनी स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर तुपकर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, तुपकरांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. तुपकरांनी पक्ष सोडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर त्यांना भावी वाटचालीस स्वाभिमानी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजच्या पिढ्यांनी पाहिलेले दुष्काळाचे हे चित्र, पुढच्या पिढीला दिसणार नाही !

News Desk

रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा

News Desk

मित्रहो आम्ही दिलेला शब्द जपला…’आरे’च्या जागेवरून आव्हाडांचे ट्विट ! 

News Desk