HW News Marathi
देश / विदेश

रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश!

टोक्यो | टोक्यो ऑलीम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून आज(४ ऑगस्ट) भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला आहे.

अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा खेळाडू

कुस्तीपटू सुशील कुमार २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत याआधी पोहोचला होता. एकीकडे कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा खेळाडू ठरला असताना दुसरीकडे फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा रवीकुमार दहीया हा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.

भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन पदके

भारत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लोव्हलिनाने चांगली लढत दिली. लोव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.

कमलप्रीत कौरला कांस्यपदक

टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनमध्ये पदक मिळवलं असून आज अॅथेलिटक्स खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा होती. डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम स्पर्धेत ती खास कामगिरी करु शकली नाही. ज्यामुळे तिला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. सहा प्रयत्नांत ६३.७० मीटर हा तिचा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजेंवर केलेल्या आक्षेपार्ह टिकेप्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

News Desk

Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna