HW News Marathi
देश / विदेश

रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी!

टोक्यो | भारताला अजून एक पद प्राप्त झालं आहे. रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. ४-७ या गुणांनी त्याचा पराभव झाला आहे. रवीकुमार दहियाचा रशियाच्या खेळाडू कडून पराभव झाला आहे. आतापर्यंत भारताला ४ पदकं मिळाली आहेत.

परंतु पंचांनी गुण नाकारले

रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले.

भारत हॉकी संघाला ४१ वर्षांनंतर पदक

भारताच्या हॉकी संघाची पदकासाठीची प्रतीक्षा तब्बल ४१ वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

हार न मानता भारताचं जोरदार प्रदर्शन

१९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक जिंकलं होतं. यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आली नाही. परंतू टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा संपवत भारतीय हॉकी संघाने पदकावर नाव कोरत, भारतीय हॉकीचे जुने दिवस पुन्हा एकदा आणले आहेत.

सामन्याच्या पहिल्या सत्रात जर्मनीचं संपूर्णपणे वर्चस्व पहायला मिळालं. टिमूर ओरुझने दुसऱ्या मिनीटाला गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीचा संघ हॉकीत गतीशील आक्रमणासाठी ओळखला जातो. संपूर्ण पहिल्या सत्रात जर्मनीने वारंवार भारतीय गोलपोस्टवर हल्ले करत भारतीय खेळाडूंना दडपणाखाली आणलं. ज्याचं उत्तर भारतीय खेळाडूंकडे दिसलं नाही. सुदैवाने पहिल्या सत्रात भारतीय संघाने एकपेक्षा जास्त गोल खाल्ला नाही.

चौथ्या सत्रात जर्मनीने आक्रमक खेळाला सुरुवात करत भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. भारताचा बचाव भेदून जर्मनीने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी निर्माण केली. यावेळी ल्युकास विंडफेडरने श्रीजेशचा बचाव भेदत जर्मनीची पिछाडी एका गोलने कमी केली होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाईम मॅक्झिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश

News Desk

भारताने सीमारेषा पार करू नये, चीनचा भारताला उपदेश

News Desk

अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक होणार नाही- सर्वोच्च न्यायालय

swarit