HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती मात्र शिवसेनेतील २ नेत्यांची याबाबत नाराजी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे . त्यांच्यावर आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांचा योग्य पाठपुरावा झाला नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी असणार आहे.

आपले महत्व कमी होईल म्हणून गटनेते एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू मात्र यावर नाराज असल्याचे समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वायकर यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या आमदारांचा एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याशी संपर्क कमी येईल म्हणून नाराजी असल्याची चर्चा आहे.

रवींद्र वायकर मातोश्रीच्या अगदी जवळचे असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याच्या पुन्हा हालचाली सुरु असल्याचं सुत्रांची माहिती आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जारी केले होते. मात्र लाभाचे पद असल्याचा आरोप झाल्याने वायकर यांनी हे पद स्वीकारलं नव्हतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ ला ठाकरे सरकारची क्लीन चीट

News Desk

निवृत्त अधिकारी नियुक्तीवरही राज्यपाल कायदेशीर सल्ला घेतील! – नवाब मलिक

Aprna

सिंधुदुर्ग येथे उभे राहणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

News Desk