पुणे | पिंपरी- चिंचवड येथे आज (२८ ऑगस्ट) उभारण्यात आलेल्या २०० ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात उभारलेल्या या रुग्णालयाचे आणि एकंदर कामगिरीची कौतुक केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि राज्याच्या दृष्टीने हे रुग्णालय उभारले आहे ते महत्वाचे आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेचे स्वागत केले कारण लोकांची गरज आणि कोविडची स्थिती लक्षात घेतां हे रुग्णालय सुरु करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
Live| Inaugurating PCMC #COVID19 Hospital in Pimpri-Chinchwad https://t.co/sqIy0pAcLQ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 28, 2020
आज २०० खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय या ओटोक्लस्टरमध्ये सुरु होत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खुप मोेठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात रोज १४-१५ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात टेस्टींग करणे, पॉझिटिव्ह आलेल्यांना मात्र लक्षणे नसणाऱ्यांना होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्यूट आयसोलेशनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. कोविडच्या विरुद्धची लढाई लढणे गरजेचे आहे. आकडा वाढतो तेव्हा चिंताही वाढते. मात्र, मोठ्या प्रमाणात टेस्टींग केल्याने किती लोकांना बाधा झाली आहे हे ही लक्षात आले. तसेच, पिंपरी चिंचवडचा रिकव्हरी रेट ८५ टक्के आहे. आणि मृत्यू दर १.०८ टक्के आहे. त्यामूळे महाराष्ट्राच्या दृष्टीने मृत्यू दर हा समाधानकारक आहे, असेही ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.