HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील मृत्यूदर कमी करणे हेच सर्वात मोठे आव्हान !

पुणे | “पुण्याचा मृत्युदर हा देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे हा मृत्युदर कमी करणे हेच मोठे आव्हान आमच्यापुढे आहे”, असे म्हणत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना पुण्यातील मृत्युदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकड्यात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. अनलॉकनंतर या शहरांची स्थिती कशी आहे याबाबत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी एच.डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्याशी आज (१२ जून) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी महापौर मोहोळ यांनी पुण्यातील कोरोनास्थितीबाबत नेमके काय भाष्य केले आहे ? जाणून घ्या

पुण्यातील वाढता मृत्युदर हेच सर्वात मोठे आव्हान !

“केंद्रीय पथकाचे असे म्हणणे होते, पुण्याची स्थिती काही प्रमाणात चांगली आहे. मात्र, पुण्याचा मृत्युदर हा देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा शहरात वाढतो आहेच. पण सध्या मृत्युदर हेच सर्वात मोठे आव्हान आहे. त्याचप्रमाणे पूर्वव्याधी असलेले रुग्ण आणि वृद्ध व्यक्तींकडे देखील विशेष लक्ष केंद्रित करायला हवे. संसर्गाचे निदान वेळेत होणे आवश्यक आहे”, असे मोहोळ यांनी सांगितले.

दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात रुग्ण बरे होण्याचा दर राज्याच्या आणि देशाच्या तुलनेत अधिक आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट ६३% आहे. पुण्यात सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील २,५८२ इतकीच आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे. फक्त मृत्यूदर चिंताजनक आहे.

पहा संपूर्ण मुलाखत :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर होणार का ?

Gauri Tilekar

भाजपचा पुढच्या महिन्यात सरपंच मेळावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

News Desk

“लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही” – छत्रपती संभाजीराजे 

News Desk