HW News Marathi
महाराष्ट्र

अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला काही चुकीचे वाटत नाही!”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यावरून कोल्हेंवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर टीका होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या दोघांनी देखील विरोध केला आहे. यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले, “एक अभिनेता म्हणून त्यांना नथुराम गोडसेची भूमिका साकारने यात मला काही चुकीचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले. पाटील पुढे म्हणाले, “पण, कोल्हेंनी ते नथुराम गोडसेंच्या विचाराशी ते किती सहमत आहेत का?, हे त्यांनी एकदा जाहीर करावे. एक अभिनेता म्हणून  ते कोणतीही भूमिका साकारू शकतात. नथुराम गोडसे ते अफझल खानचीही भूमिका साकारू शकतो. यात काही होते,” ते म्हणाले. 

‘व्हाय आय किल्ड’ या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झाले होते. त्यावेळी मी राजकारणात सक्रिय नव्हतो. तेव्हा नथूराम गोडसेची भूमिका साकारली होती. कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो. तेव्हा तो कलाकार त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे नाही. मी केवळ एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असून यांचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडणे हे योग्य नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले.

कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही – आव्हाड

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे साकारत असलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर ट्वीट करत त्यांचा विरोध केला आहे. आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.” ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभाविपचे सेल्फी विथ कॅम्पस अभियान, महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

News Desk

नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे?

News Desk

#CoronaVarrus : राज्यातील पहिल्या ‘कोरोना’बाधित दाम्पत्यांना आज मिळणार डिस्चार्ज

swarit