HW News Marathi
Covid-19

नितीन गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

नागपूर | राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार होत असल्याचं समोर आलं होतं. साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 30 ते 40 हजारांना विकल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानंतर आज(१३ मे) या कंपनीतून इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर आला आहे.

नितीन गडकरी यांनी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. एकूण ’17 हजार इंजेक्शन वापरास सज्ज झाले आहेत. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले आहेत. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत 5 मेला रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती.

नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने रेमडेसिव्हीरचे उत्पादन

दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येत आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये 30 हजार इंजेक्शन्स बनवण्याचं लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात २४ तासांत तब्बल ८१,४४६ नवे रुग्ण, परिस्थिती चिंताजनक!

News Desk

दिलासादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट, ५० हजारांच्या घरात आढळले नवे रुग्ण

News Desk

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk