मुंबई | सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात आणि राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली होती. दरम्यान, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात जो गुन्हा दाखल केला होता तो मागे घेतला आहे. आणि एका निवेदनातून तिने या संपुर्ण बाबीचा खुलासाही केला आहे. ट्विट करत तिने आपले निवेदन दिले आहे. हे निवेदन हिंदीत लिहिले आहे.
यात रेणू शर्मा हिने असं लिहिले आहे की, “धनंजय मुंडे आणि माझी बहिण करुणा शर्मा यांच्यात काही काळापासून गोष्टी बिनसल्या आहेत. ज्यामुळे मी मानसिक तणावात होते. त्यानंतर मला मी कोणत्यातरी राजकीय षडयंत्राची शिकार होत आहे असं वाटलं. इतकंच नाही तर माझ्या खांद्यावरुन बंदुक ठेवत धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे असंही वाटलं. मी स्पष्ट करु इच्छिते ती धनंजय मुंडेविरोधात बलात्काची कोणतीही माझी तक्रार नाही आहे. तसंच, त्यांच्याकडे किंवा माझ्याकडे कोणतेही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ नाही आहेत”, असं स्पष्टपणे रेणू शर्माने निवेदनात स्पष्ट केले आहे.
🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/MBVGH8JgzT
— renu sharma (@renusharma018) January 22, 2021
रेणू शर्माचे हिंदीतील निवेदन –
मैंने श्री धनंजय मुंडे जी के खिलाफ शादी के वादे और बलात्कार का आरोप किया था उसके संदर्भ में मेरा निम्नवत निवेदन करती हु |
मै स्पष्ट करना चाहती हु की मेरी बहन करुणा और धनंजय मुंडेजी के बिच पिछले कुछ समय से दरार आई है, और उनके बिच कोर्ट केस भी शुरू है | जिसके चलते मै मानसिक तनाव और दबाव में थी | साथ ही में मुझे ऐसा महसुस हुआ की मै कोई बड़े राजनैतिक षड्यंत्र की शिकार हो रही हु | और कुछ लोग मेरे कंधे पर बन्दुक रखकर धंनजय मुंडे को टारगेट कर रहे है | और मुझे ये मेहसूस हुआ की ये जो भी हो रहा है गलत है |
मै अपने घर के किसी भी व्यक्ति का नाम इन सब मामलो में नहीं लाना चाहती, क्योकि मुझे मेरे घरवालों से रिश्ता ख़राब नहीं करना है | अंत में मै बस इतना कहना चाहती हू की मैंने धनंजय मुंडे के खिलाफ जो शिकायत दायर की है वह शिकायत मै पुरी तरह से वापस ले रही हु |
मै उनके खिलाफ ऐसे किसी भी शिकायत का पीछा नहीं करना चाहती | मै रिकॉर्ड के लिए स्पष्ट करना चाहती हु की मुझे धनंजय मुंडे से शादी के वादे का उल्लंघन और बलत्कार की कोई शिकायत नहीं है, और ना ही मेरे पास उनका कोई अयोग्य फोटो या व्हिडिओ है और न ही उनके पास मेरा कोई फोटो या व्हिडिओ है, क्योकि ऐसा कुछ कभी हुआ ही नहीं है | मेरी धनंजय मुंडे के खिलाफ कोई भी शिकायत नहीं है | यह स्टेटमेंट मै पुरे होशो हवास में दे रही हु |
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.