मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता बऱ्याच नव्या गोष्टींचा खुलासा होताना दिसत आहे. तक्रारदार महिला रेणू शर्माने मलाही फसवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, मी कुणालाही फसवलं नसून, कृष्णा हेगडे यांनीच मला बोलण्याचा प्रयत्न केल्याचं रेणू शर्मा यांनी म्हटलं आहे. “मी हनी ट्रॅपच्या कुठल्याही प्रकारमध्ये सहभागी नाही. मी कुणालाही फसवलं नाही. उलट भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ते मला भेटले,” असा खुलासा रेणू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे.
This is motivated action of Mr. Dhananjay Munde after my complaint. I was never involved in any honey trap activity as alleged. Infact Mr.krishna Hegde started the conversation with me. He met me in birthday party of Mr. Pratap SirNaik(MLA).
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
गायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्माने मला रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच २०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला होता.
The allegations made by Mr. Krishna Hedge is false bogus and baseless. He is trying to tarnish my image and defame me in the society and also trying distract me from filing the FIR against Mr. Munde this is counter attack on me since I am filing FIR against Mr. Munde.
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
रेणू शर्माने काय केलं ट्विट?
हेगडेंच्या या आरोपानंतर रेणू शर्मा यांनी खरंच कृष्णा हेगडे यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला का?, असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर शर्मा यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी मी कुणालाही हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला नसल्याचं म्हटलंय. “माझ्यावर हनी ट्रॅपचे जे आरोप करण्यात आले आहेत, ते चुकीचे आहेत. मी कोणत्याही हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सहभागी नाही. कृष्णा यांनीच माझ्याशी बोलण्यास सुरुवात केली. ते मला शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये भेटले,” असं रेणू शर्मा यांनी हेगडे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय.
कृष्णा हेगडेंनी काय आरोप केला ?
रेणू शर्मा यांनी रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी 14 जानेवारी रोजी केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
“मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी,” असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.