HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात? भाजपचा सवाल 

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपावरुन प्रचंड गोंधळ झाला आहे. अशात विरोधी पक्ष असलेल्या भाजपला आणखी एका विषयावरुन सरकारला टोमणा आणि सुनावण्यासाठी कारण मिळाले, ते म्हणजे शरद पवारांची मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेली भेट. भाजप नेते निलेश राणे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली यावर आक्षेप नोंदवला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील भेटीवर प्रश्न चिन्ह उभं केले आहे.

शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवर निलेश राणेंनी ट्विट करुन प्रश्न विचारले आहेत. “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं,” असं ट्विट करत निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

निलेश राणेंनी विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित मुंबईचे सहपोलीस आयुक्त बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला त्यांच्या घरी कसे भेटू शकतात, हा प्रश्न विचारला. हा प्रकार केस झाकण्यासाठीचा अजेंडा दिसतो, अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल, असंही निलेश राणे म्हणाले. सामान्य नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे का?, असा सवालही ही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

विश्वास नांगरे पाटील – शरद पवार सिल्वर ओकवर भेट

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट पवारांच्या भेटीला 14 जानेवारीला सायंकाळी पोहोचले होते. सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा केली. धनंजय मुंडेंवरच्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विश्वास नांगरे पाटील – मुख्यमंत्री भेट

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. विश्वास नांगरे पाटलांनी सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे अजूनही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांची पुन्हा टीका!

News Desk

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

News Desk

पवारांची केंद्रावर टीका

News Desk