HW News Marathi
महाराष्ट्र

पत्रकारांना कोरोना योद्धा या क्षेत्रात ग्राह्य धरण्याचा सकारात्मक विचार करू – राजेश टोपे

पुणे | राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम करीत असतात, त्यामुळे पत्रकार यांना कोरोना योध्दा या क्षेत्रात ग्राह्य धरण्याबाबत येत्या कॅबिनेट मध्ये सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पत्रकार पांडुरंग रायकर याचा कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली संघाचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याबरोबर पत्रकार ही मागे नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा गृहीत धरून 50 लाखांचे विमा कवच जाहीर करावे, आणि तसा शासन आदेश निर्गमित करावा .तसेच पत्रकार पांडुरंग रायकर याला तातडीने 50 लाखांची मदत द्यावी, त्याचबरोबर जे माध्यमकर्मी, पत्रकार कोरोना बाधित होतील त्यांच्यासाठी खाजगी रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून मोफत उपचार करावेत आणि त्याबाबतचे तातडीने शासन आदेश काढावेत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘निपाह व्हायरसनं वाढवली चिंता, १२ वर्षीय मुलाचा झालं मृत्यू!’

News Desk

मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडलं म्हणणारे मुर्ख!

Aprna

“मी मास्क घालतच नाही…!” – राज ठाकरे

News Desk