HW News Marathi
देश / विदेश

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा चित्ररथ सादर होणार

मुंबई | २६ जानेवारीला प्रजास्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या राजपथावर संचलनाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर होणार आहे. हा चित्ररथ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संतपरंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दिल्लीच्या कंटेंटमेन्ट परिसरातील रंगशाळेत चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती आकर्षण ठरत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांसह महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुबक प्रतिकृती चित्ररथावर असणार आहेत. महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वैचारिक वारसा या चित्ररथातून प्रतित होणार असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्धीचे दर्शन याद्वारे देशाला घडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk

नागरिकांना ६ महिने पुरेल इतका अन्नसाठा देशात आहे

News Desk

नालासोपारा येथे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

News Desk