HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांकडून चॅनलचा खोटा TRP वाढवणारे रॅकेट उध्वस्त, रिपब्लिक टीव्हीचा यात समावेश

मुंबई | पत्रकार म्हणजे एक महत्वाचा घटक आहे. संविधाच्या महत्वाच्या स्तंभांपैकी एक आहे. मात्र, त्याचा गैरवापर होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी ३ टीव्ही चॅनल पैसे देऊन टीआरपी वाढवत असल्याचे रॅकेट समोर आणले आहे. मुंबई पोलिसांच्या या महत्वाच्या कामगिरीची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिक चॅनल, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या ३ चॅनेलवर घरांत पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचे समोर आले आहे. तसेच, रिपब्लिक चॅनेलने पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. त्याची तपासणी पोलिस करणार आहेत. ज्या घरात इंग्रजी येत नाही त्याची घरात इंग्रजी चॅनेल सुरु असल्याचे मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. फॉल्स टीआरपीसाठी एक टोळी कार्यरत आहे. आणि हे रॅकेट मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. दरम्यान, या तीनही चॅनलच्या प्रमुखांच्या चौकशी होणार आहे.

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी ४०० ते ५०० रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल, अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधी पुण्यात आघाडी सरकारची बॅनरबाजी

News Desk

“मी सेटलमेंट केली तर महाराष्ट्राचे डीजीपी माझ्या विरोधातील…” परमबीर सिंगांचा आरोप

News Desk

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”, भाजपचा राज्य सरकारला सवाल

News Desk