HW News Marathi
महाराष्ट्र

सकल मराठा समाजाचा संघर्ष व बलिदानामुळेच आरक्षण !

मुंबई | मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाल्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक संमत करताना काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे हे विधेयक वैध ठरविण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करीत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने विराट ५८ मोर्चे काढून इतिहास घडवला. तब्बल ४० तरूणांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर भाजप सरकारवर दबाव निर्माण झाला आणि विधीमंडळात एकमताने मराठा आरक्षण कायदा मंजूर करावा लागला. मुंबई उच्च न्यायालयानेही मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयावर आज शिक्कामोर्तब केला याचा आम्हाला आनंद असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. “नवीन सरकारने प्रारंभी मराठा आरक्षणासंदर्भात तत्परता दाखवली नाही. त्यामुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागले”, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे.

“मराठा आरक्षणासोबतच धनगर व मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबतही राज्य सरकारने वेगाने कार्यवाही करून निर्णय घेतला पाहिजे. काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लीम समाजातील मागास घटकांना दिलेल्या ५ टक्के शैक्षणिक आरक्षणावर उच्च न्यायालयाने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. तरीही विद्यमान सरकारने त्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. भाजपने धनगर समाजाला आरक्षणाबाबत दिलेले वचन पाळले नाही”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

News Desk

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?

News Desk

राडारोडा काढण्याची व नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk