HW News Marathi
महाराष्ट्र

ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही!

मुंबई। दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान त्यांच्यावर शाईफेकली. ‘ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. राज्यातील मराठी साहित्य संमेलनाच्या आज (५ डिसेंबर) शेवटचा दिवस होता. यावेळी कुबेरांवर शाईफेक करणारे हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर राज्यातील दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार ट्वीट मध्ये म्हणाले, “लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भाचा विवाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून चालू आहे. हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. लोकशाहीत अधिकार असल्याने गिरीश कुबेर आपली मते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1467478931439640577?s=20
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना नींदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1467478933184475138?s=20
विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणं चुकीचं आहे. पण इथे घडणं आणखी चुकीचं आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1467478934769987585?s=20
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र एकीकरण समिताच्या शुभम शेळकेंच्या मतपेटीत १ लाखांपेक्षा जास्त मतांची पडली भर 

News Desk

पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा; राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

प्रणिती शिंदेंना सोलापूरचे पालकमंत्री करा, भाजप नगरसेवकाची अजब मागणी

News Desk