HW News Marathi
महाराष्ट्र

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!

मुंबई | ‘आरक्षण गेलं खड्ड्यात; सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत द्या’, अशी संतप्त जनक प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून केली आहे. या घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्द पुन्हा एकदावर आला आहे. कॉलेजसाठी प्रवेश न मिळाल्याने मराठा विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्या केली आहे.

उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता.या घटनेचा दाखला देत संभाजीराजे छत्रपती यांनी पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे.

समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. ‘योग’ करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय??, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थिती केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

News Desk

राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार !

News Desk

“मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी”, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna