HW News Marathi
Covid-19

मंडपात मुखदर्शन नाहीच…गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

मुंबई | कोपिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत

1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

2. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.

7. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

8. आरती भजन कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk

“भीक मागा, उधार घ्या, पण ऑक्सिजन द्या” उच्च न्यायालयाने केंद्राला ठणकावले

News Desk

राज्यातील कडक निर्बंध आणखी १५ दिवसांसाठी वाढले

News Desk