HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल उद्या

औरंगाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल मंगळवारी १२ जून रोजी लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. अपात्र ठरवलेल्या १० नगरसेवकची मते एकत्रित करुन मतमोजणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. हा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एक. के. कोतवाल या दोन्ही न्यायाधीशांनी हा आदेश दिले आहे.

उस्मानाबाद-लातूर-बीड प्रतिष्ठेची लढाई

लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी यांच्यात प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे हे दोघे ही आमने सामने आहेत. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी पाठिंबा दिला आहे.

Related posts

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

News Desk

पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया….

News Desk

कोरोना प्रतिबंधक साधनांचा पुरवठा बंद होणार यावर रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

News Desk