HW News Marathi
महाराष्ट्र

निवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

नागपूर | मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे पहाटेच्या सुमासार निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९१ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पश्चात दोन मुले सत्यरंजन (न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय) व आशुतोष (ज्येष्ठ वकील), एक मुलगी अरुणा पाटील आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता भोले पेट्रोल पंपाजवळील विनोबा विचार केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ४ च्या सुमारास अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याविषयी थोडक्यात

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशमधील रायपूर येथे झाला. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. न्यायदानात त्यांनी मोलाचे योगदान दिले. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निकाल दिशादर्शक ठरले होते. २००३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी पुस्तकांचे लिखाणही केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे म्हणाले, “काय बाई सांगू?”; शिवेंद्रराजेंनी विचारलं, “तुम्हाला लाज…”

News Desk

परळीत जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

News Desk

चिपळूणच्या भीषण पूरस्थिती नियंत्रणाच्या रेस्क्यूसाठी 2 हेलिकॉप्टर रवाना!

News Desk