HW News Marathi
महाराष्ट्र

महसुली विभाग वाटप नियम 2015 मध्ये सुधारणा

शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना आपल्या पतीच्या आई-वडिलांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तवही महसुली विभाग बदलून मिळण्यासाठी विनंती अर्ज करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महसूली विभाग वाटप नियम – 2015 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरजू महिला अधिकाऱ्यांची सोय होणार आहे.

राज्य शासनातील गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम – 2015 तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांना स्वत: किंवा आपला जोडीदार, मुले अथवा अवलंबून असलेले आई-वडील यांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तव महसूल विभाग बदलण्यासाठी विनंती अर्ज करण्याची मुभा होती. यामध्ये सुधारणा करून आता महिला अधिकाऱ्यांनाही आपल्या सासू-सासऱ्याच्या सुश्रुषेसाठीही महसुली विभाग बदलून मिळण्याची विनंती करण्याची मुभा देण्यात आली आहे.

यासोबतच महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी आपापसात महसुली विभाग (Mutual Change) बदलून देण्याची विनंती केल्यास बदली करण्याच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय मंडलीक गटाला धक्का ! विरेंद्र मंडलीक यांचा पराभव

News Desk

‘त्या’ ट्वीटमुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत

News Desk

शिवसैनिकांचा मला जिवे मारण्याचा प्रयत्न!, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna