HW News Marathi
महाराष्ट्र

रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती रडारवर असतानाच आता रिया आणि प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील ‘कथित’ व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाले आहेत. रिया ८ जूनला सुशांतच्या घरी गेली होती, तेव्हा तिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी संपर्क साधला, असे म्हटले जाते. त्यावेळी तिने सुशांतसोबतच्या संबंधांबाबत महेश भट्ट यांच्याशी गप्पा मारल्या. आपणच सुशांतला सोडल्याचं तिने ‘व्हायरल चॅट’मध्ये म्हटले आहे.

सुशांतचे घर सोडल्यानंतर तिने तात्काळ महेश भट्ट यांना मेसेज पाठवला होता. ‘आयशाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. तुमच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाने माझे डोळे उघडले. तुम्ही माझे देवदूत आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि अजूनही आहात’, असं रियाने म्हटलं आहे. यावर महेश भट्ट यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता मागे वळून पाहू नको. जे संभव आहे ते साध्य करून दाखव. तुझ्या या निर्णयामुळे तुझे वडील खूश होतील.’ असं महेश भट्ट म्हणाले आहेत. यावरून अभिनेत्रीचे वडीलही या नात्यावर खूश नव्हते, असं स्पष्ट होत आहे.

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे तरी देखील त्याच्या आत्महत्येचं ठोस कारण समोर आलेलं नाही. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये भाजपला धक्का, २ नेते हाती बांधणार शिवबंधन

News Desk

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

News Desk

मराठा मोर्चाची अमेरिकेत दखल

News Desk