HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraElections2019 : राज्यातील दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान सुरू आहे. राज्यातील २८८ जागांसाठी ३२३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी या दोघांनी नागपूरमध्ये मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सहकुटुंबांनी दादरमधील बालमोहन शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, युवानेता आणि वरळीतील भाजपचा उमेदवार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला मतदानाच हक्क बजविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळेच दोषी सुटले आणि बाबरी फाईल बंद, मग बाबरी पाडली कोणी? – सामना

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आहे | अजित पवार 

News Desk

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा!

News Desk