HW News Marathi
महाराष्ट्र

रितेश- जेनेलियाचा मरणोत्तर अवयव दानाचा निर्णय

मुंबई | आपले आवडते कलाकार नेहमीच आपल्याला काही ना काही नवीन करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. आणि आपल्यापुढे एक चांगले उदाहरण देखील ठेवत असतात. असंच एक उत्तम उदाहरण प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख यांनी ठेवले आहे. काल (१ जुलै) ‘डॉक्टर्स दिना’च्या निमित्ताने मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रितेश-जेनेलिया यांनी अवयवदानाची माहिती दिली.

“रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. पण ते शक्य झाले नव्हते. डॉक्टर दिनाचे औचित्य साधत आम्ही अवयवदान करण्याची शपथ घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI यांचे आभार. तुम्हाला कोणाला सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असेल, तर ‘आयुष्य’ हेच ते गिफ्ट आहे. या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या, असे आवाहन रितेश आणि जेनीलिया यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/CCGQfaKpq6e/?igshid=10aqhh3cv9ji5

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार

News Desk

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार! – मुख्यमंत्री

Aprna

नाहीतर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल…आयुक्तांचा इशारा

News Desk