HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या काळात आम्ही राष्ट्रवादी बळकट करु, रोहिणी खडसेंचा निर्धार

जळगाव | भाजपची वाट सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी देखील भाजपला राम राम राम केला. त्यानंतर आज जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. “गेल्या दोन दिवसांपासून आमच्या पाठीराख्यांचं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आम्हाला मिळतंय. महाराष्ट्रभरातून असंख्य फोन येतायेत की आपण घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे पक्षप्रवेशानंतर एक वेगळी भावना झालेली आहे. येत्या काळात आम्ही राष्ट्रवादी बळकट करु”, असा निर्धार रोहिणी खडसे यांनी बोलून दाखवला आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं सर्व कुटुंब देखील उपस्थित आहे. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जशी आमच्या पक्षप्रवेशाची घोषणा केलीये तसा एक वेगळा उत्साह संचारला आहे. येत्या काळात आम्ही पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादीचं काम करु आणि संघटनावाढीसाठी प्रयत्न करु”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. एकनाथ खडसेंवर झालेल्या अन्यायामुळे आम्हाला कुटुंब म्हणून त्रास झाला, असं सांगताना आता यापुढच्या काळात राष्ट्रवादीचं मोठं काम आम्ही उभा करु, असा निर्धार यावेळी रोहिणी खडसे यांनी बोलून दाखवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम जन्मभूमीच्या संघर्षातील नेत्यांवरील ठपका पुसला गेला!

News Desk

आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ अधिक गतिमान होणार !

News Desk

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar