HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

जर सूडाचं राजकारण केलं जात असेल…

Rohit Pawar

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतल्या निवासस्थानातील सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबतची कोणतीही पुर्वकल्पना न देत केंद्रीय गृहखात्याने ही सुरक्षा हटवली आहे. राज्यात शरद पवार यांना Z security आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड शिफ्टमध्ये काम करत होते तसेच एक PSO देखील होता. पण २० जानेवारीपासून सुरक्षा रक्षक ड्युटी वर आले नाहीत तेव्हा सुरक्षा कमी करण्यात आल्याचे लक्षात आले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा हटवली? असा चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘आज अख्ख्या देशामध्ये ठराविकच अनुभवी नेते आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांचा समावेश होतो. पवारांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला नक्कीच होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याविषयी वेळोवेळी बोलले आहेत. पवारांची सुरक्षा जर कमी करण्यात आली असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही गोष्ट चुकीची वाटते’, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, ‘शरद पवार याबद्दल बोलतीलच. महाराष्ट्राची सत्ता तुमची आहे, असं तुम्हाला वाटत असेल, पण लोकांनी जनादेश महाविकास आघाडीला दिला आहे, म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल, त्यामुळे जर सूडाचं राजकारण केलं जात असेल, तर ही चुकीची गोष्ट आहे’ असंही पुढे रोहित पवार म्हणाले.

Related posts

मुख्यमंत्री संपूर्ण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढणार

News Desk

स्टीअरिंग नातवाच्या हातात, तर आजोबा शरद पवारांचे नातवाला ड्रायव्हिंगचे धडे

News Desk

कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार

News Desk