HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता? – रोहित पवार

मुंबई | राज्यात तीन पक्षांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू आहेत. अशा टीका विरोधी पक्षांकडून होत आहेत. यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी वर राजकीय टिका करताना पोपटासारखे बोलणारे राज्यातील BJPचे सर्व नेते सामान्यांसाठी महत्त्वाच्या इंधन दरवाढीवर मात्र न बोलता वादळात वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या शहामृगाच्या भूमिकेत जातात. केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता?याचं स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावं, असे ट्विट करत त्यांनी भाजपला प्रश्न विचारला आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. एवढ्यावरच रोहित पवार थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकूमशाही होती.

भारतीय जनता पार्टी हे ऑक्टोबर पर्यंत सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली होती. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी संजय राऊत यांच समर्थन करत भाजपालाच इशारा दिला आहे.

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये वर्चस्वाचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचंही बोललं जात होतं. विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासूनच असे आरोप होते. त्यात या घटनेनं भर पडली आहे. यावर पारनेर येथे प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी हे उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार कार्ड पडताळणीसाठी आता चेहऱ्याचा आधार

swarit

कृषी विधेयकाला विरोध करणारे हेच ते दहशतवादी!

News Desk

एकनाथ शिंदेंनी मदत तरी केली, उद्धवजी कपड्याची इस्त्री न मोडता कोकणातून परतले – नितेश राणे

News Desk