HW News Marathi
महाराष्ट्र

“पडळकरांना आमदारकी फक्त पवारांवर टीका करण्यासाठी दिली”, रोहित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर

अहमदनगर। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कायम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा रोहित पवार यांच्यावर वारंवार टीका करतांना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच पलटवार केला आहे. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणालाही विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मोठ्या नेत्यावर कुणी असं वक्तव्य करत असेल तर एखाद्या युवकाला ते चुकीचं वाटलं असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पडळकरांच्या गाडीवरील दगडफेकीबाबत दिली आहे.

सोलापूरातील प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सोलापुरात त्या युवकाने जे केलं ते चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. मात्र, त्यामागील विचारही समजून घेणं महत्वाचं आहे. जे भाजप नेते पडळकरांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी सांगावं की जे वक्तव्य पडळकरांनी केलं ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतं का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पडळकर यांना जी आमदारकी दिली गेलीय ती फक्त पवारांवर टीका करण्यासाठी देण्यात आलीय. पडळकर अशी टीका करतात की त्याचं उत्तरही देता येत नाही. कारण त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल, असा घणाघात देखील रोहित पवारांनी केलाय दोन दगडं एकमेकांवर आदळली तर आगच पेटेल, त्यापेक्षा न बोललेलं बरं, असंही रोहित पवार म्हणाले.

पडळकरांनी शरद पवारांवर काय टीका केली होती?

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवली. कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय. सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीचा काच फुटला आहे. मात्र, गाडीतील कुणालाही दगड लागला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरावर सोन्याचा पाऊस

News Desk

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा – यशोमती ठाकूर

News Desk

महडमध्ये प्रसादातून विषबाधा तीन बालकांचा मृत्यू

News Desk