HW News Marathi
महाराष्ट्र

लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको, विजयानंतर रोहीत पवारांचा राम शिंदेंना टोला

मुंबई | आज (१८ जानेवारी) संपूर्ण राज्याचं लक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं असून महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे १४ हजार पैकी ६ हजार पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही शिंदे यांना धक्का दिला आहे.

रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायतीमध्ये कोणताही झेंडा किंवा चिन्ह घेऊन लढत नसतो, तिथे कार्यकर्ते असतात. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आणि चांगली ताकद लावली. त्यातूनच हा विजय झाला आहे. पुढील काही दिवसांत एक नंबर, दोन नंबर कोण या गोष्टी कळतील. आज हे सांगणं योग्य नाही. पण काम करताना सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच काम करावं लागेल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“ज्या ठिकाणी अनेक वर्ष काही ठराविक लोकांकडे सत्ता आहे मात्र तरीही विकास झाला नाही तिथे लोकांनी मोठ्या प्रमाणात बदल केलेला दिसत आहे. लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विकासाची कामं करु. इतकंच नाही तर ज्या ग्रामपंचायतींमध्ये कदाचित आमच्या विचारांचे सदस्य नसतील पण लोकं, मतदार आमचीच आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल,” असं आश्वासन रोहित पवार यांनी यावेळी दिलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या राम शिंदेंविरुद्ध रोहित पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. त्याचे परिणाम हळूहळू दिसून येत आहे. राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांचा गट विजयी झाला आहे. चौंडी ग्रामपंचायतीतील ९ पैकी ७ जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फी मध्ये ५० टक्के सवलत देऊन विद्यार्थी पालकांना दिलासा द्या,’ भाजपची मागणी

News Desk

औरंगाबादची निवडणुक हिंदुत्त्वाच्या मुद्दयावर लढणार !

swarit

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

Jui Jadhav